आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Refuses To Grant More Time To Bollywood Actor Sanjay Dutt

येरवडा तुरुंगात शरण येण्‍यासाठी संजय दत्तने दाखल केली याचिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- सर्वोच्‍च न्‍यायालयाने अभिनेता संजय दत्तला आणखी एक दणका दिला आहे. शिक्षा भोगण्‍यासाठी शरण येण्‍याकरीता काही दिवसांची मुदत देण्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयाने नकार दिला आहे. चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण करण्‍यासाठी बॉलीवूडच्‍या दोन निर्मात्‍यांनी संजय दत्तला काही दिवसांची मुदत देण्‍याची विनंती एका याचिकेतून केली होती. परंतु, न्‍यायालयाने त्‍यांची विनंती मान्‍य केली नाही. त्‍यामुळे संजय दत्तला शरण येण्‍यासाठी केवळ एकाच दिवसाचा अवधी आहे. दरम्‍यान, संजय दत्ताने येरवडा तुरुंगात शरण येण्‍यासाठी विनंती याचिका दाखल केली आहे. विशेष टाडा न्‍यायालयात त्‍याने यासंदर्भात याचिका दाखल केली असून त्‍यावर सीबीआयने लगेच उत्तर देण्‍याचे निर्दश न्‍यायालयाने दिले आहेत.

संजय दत्त सध्‍या काही चित्रपटांच्‍या चित्रीकरणात व्‍यस्‍‍त आहे. त्‍याची शिक्षा कायम ठेवण्‍यात आल्‍यामुळे निर्मात्‍यांची गोची झाली. तरीही त्‍याला एकूण दोन महिन्‍यांचा कालावधी न्‍यायालयाकडून मिळाला होता. जवळपास 2.5 अब्‍ज रुपये त्‍याच्‍या तुरुंगात जाण्‍यामुळे अडकून बसणार आहेत. यामुळे बॉलीवूडमध्‍ये खळबळ उडाली आहे. पी. सत्शिवम आणि बी. एस. चौहान यांच्‍या खंडपीठाने निर्मात्‍यांची याचिका फेटाळताना स्‍पष्‍ट केले की मार्चमध्‍ये देण्‍यात आलेल्‍या निर्णयाचा फेरविचार करण्‍यासंदर्भात कोणतेही औचित्‍य नाही.