आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Refuses To Hear Maharashtra's Plea On Maratha Reservation

सरकारला धक्का : मराठा आरक्षणाची याचिका दाखल करून घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक
नवी दिल्ली - मराठा आरक्षणाच्या निर्णयावर सरकारला मोठा धक्का बसला आहे. हायकोर्टाने मराठा आरक्षणावर लावलेल्या स्थगितीच्या निर्णयाविरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत आधी हायकोर्टाला अंतिम निर्णय घेऊ द्या, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाला स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश मुंबई हायकोर्टाने दिला होता. त्या आदेशाच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सरकारची याचिका तग धरू शकली नाही. हायकोर्टाने दिलेला आदेश हा अंतरिम आदेश आहे, अंतिम निर्णय नाही. त्यामुळे या प्रकरणी आधी हाय कोर्टाला अंतिम निर्णय घेऊ द्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

सरकार बोलावणार सर्वपक्षीय बैठक
आरक्षणाच्या मुद्यावर सरकारसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कदाचित त्यामुळेच सरकारनेही लगेचच या प्रकरणी हालचाल सुरू केली आहे. राज्य सरकार गुरुवारी किंवा शुक्रवारी या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची शक्यता आहे. त्यानंतर या प्रकरणी पुढी दिशा ठरवली जाणार आहे.