आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅम्बी व्हॅली लिलावाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, सहाराची याचिका कोर्टाने फेटाळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने सहारा ग्रुपच्या पुणे येथील अॅम्बी व्हॅली टाऊनशिपचा लिलावाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. सहारा ग्रुपने बुधवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाला स्थगिती देण्याची अपील केली होती. गुरुवारी सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली. यामुळे अॅम्बी व्हॅलीचा लिलाव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
 
 सहाराने म्हटले होते, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे...
 - सहारा ग्रुपचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाला अपील केली होती की, अॅम्बी व्हॅली सेल नोटीसच्या पब्लिकेशनला स्थगिती द्यावी.
- ते म्हणाले, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पेमेंट प्लॅन रिव्ह्यूसाठी आणखी काही वेळ दिला जावा. लिलावाची प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत रोखावी. यामुळे ग्रुपला सेबी-सहारा अकाउंटमध्ये जमा करावयाचे 1500 कोटी रुपयांची जमवाजमव करायला पुरेसा वेळ मिळेल.
 
पूर्ण पेमेंट केल्यास लिलाव थांबेल
- सुप्रीम कोर्टाने सहारा समूहाला 7 सप्टेंबरपर्यंत सेबीच्या अकाउंटमध्ये 1500 कोटी रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता. हेही स्पष्ट केले होते की, जर ग्रुपने वेळेवर सर्वांचे पेमेंट केले, तर लिलावाची प्रक्रिया थांबवली जाईल. ग्रुपकडून कोर्ट इन्स्टॉलमेंट्सची वसुली करत आहे. आतापर्यंत ग्रुपने 16,000 कोटी रुपये भरलेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...