आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Refuses To Stay Centre's Decision To Appoint Lt Gen Dalbir Singh Suhag As Next Army Chief

लेफ्टनंटर जनरल यांचा लष्कर प्रमुख पदाचा मार्ग निरधोक, दास्तानेंची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लेफ्टनंट जनरल दलबीर सिंह सुहाग यांचा लष्करप्रमुख पदाचा मार्ग आता निरधोक झाला आहे. त्यांच्या नियुक्तीस आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने यांनी जनरल सुहाग यांच्या नियुक्तीस आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश टी.एस.ठाकूर यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली त्याचसोबतच अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनीही दास्ताने यांच्या याचिकेला विरोध दर्शविला आहे.

दलबीर सिंग सुहाग हे सध्या उपलष्करप्रमुख असून लेफ्टनंट जनरल पदाच्या रेसमधील अधिकार्‍यांमध्ये ते वरिष्ठ आहेत. यूपीए सरकारने जाता जाता सुहाग यांना नियोजीत लष्करप्रमुख नियुक्त केले आहे. सध्याचे लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांच्याकडून सुहाग हे 31 जुलै रोजी पदाची सुत्रे स्वीकारणार आहेत.

हाग यांच्या नियुक्तीबाबत पक्षपातीपणा झाला असल्याचा आरोप दास्ताने यांनी केला होता. सुप्रीम कोर्टाने मात्र, त्यांचा दावा फेटाळून लावला आहे.