नवी दिल्ली - आपल्याला कंपनीच्या कामासाठी परराष्ट्रात जाण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज 2 जी घोटाळ्यातील आरोपी एस्सार ग्रुपचे प्रमोटर रवी रुइया यांनी सर्वोच्च न्यायालयाने केला होता. मात्र, न्यायालयाने विजय मल्ल्या यांचा संदर्भ देत तो फेटाळला. शिवाय यापूर्वी एका आरोपीला परराष्ट्रात जाण्याची परवानगी दिली होती. तो गेला तर अजून आलाच नाही. त्यातून आम्ही धडा घेतल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.
सर्वोच्च न्यायालयाने अजून काय म्हटले...
- न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने या अर्जावर मंगळवारी सुनावनी केली.
- न्यायालयाने विजय मल्ल्याचे थेट नाव न घेता त्यांचा उल्लेख केला.
- न्यायालयाने म्हटले, 2 जी घोटाळ्यातील आरोप खूप गंभीर आहे. त्यामुळे देशाबाहेर जाण्याची परवानगी देता येणार नाही.
- रुइया यांनी यापूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयात विदेशात जाण्याची परवानगी मिळावी, त्यासाठी अर्ज केला होता. तो फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
रुइयांच्या वकिलांनी काय केला युक्तीवाद ?
- कंपनीच्या कामासाठी रुइया यांना दोन महिन्यांसाठी कॅनडा, सौदी अरब, ब्रिटन आणि रशियाला जाण्याची परवानगी द्यावी, या मागणीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आला होता.
- रुइया यांच्यावर केवळ फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर इतर गुन्हे नाहीत. त्यामुळे त्यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी द्यावी, असा युक्तीवाद त्यांच्या वकिलांनी केला.