आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्जीने घेतलेल्या घटस्फोटासाठी 6 महिन्‍यांच्‍या प्रतिक्षा कालावधीची गरज नाही -SC

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मर्जीने घेतलेल्या घटस्फोट प्रकरणात दोन्ही पक्षांमधील मतभेत मिटण्याची शक्यता नसेल तर, 6 महिण्याच्या प्रतिक्षा कालावधी (वेटिंग पीरिएड)ला ट्रायल कोर्टात संपवता येऊ शकेल, असे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हिंदू मॅरेज अॅक्ट 1955 नुसार, मर्जीने घटस्फोट घेतलेल्या प्रकरणात पहिल्या आणि सेवटच्या मोशनमध्ये 6 महिण्याची वेळ देण्यात येते. दोघांना आपापसातले मतभेद मिटवावे यासाठी हा वेळ देण्यात येतो. शेवटच्या मोशन नंतर मर्जीने घटस्फोट घेता येऊ शकतो.
 
- वृत्तसंस्थेनुसार, न्यायधिश ए के गोयल आणि न्यायाधिश यू यू ललित याच्या बेंचने म्हटले की, सेक्शन 13B (2) मध्ये 6 महिण्यांच्या प्रतिक्षा कालावधीचा उल्लेख करण्यात आला आहे. तो गरजेचा नसून निर्धारीत आहे. जर दोघांमधिल मदभेत मिटत नसेल आणि  दोघांनी मुलांच्या ताबा आणि इतर वादांतून तोडगा काढला आसेल, तर कोर्ट आपल्या आधिकारांचा वापर करून प्रतिक्षा कालावधी (कुलिंग पिरिएड) संपवू शकते. 
बातम्या आणखी आहेत...