आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्ती जाहीर करा, SC चा विजय मल्ल्यांना आदेश, बँकांनी प्रस्ताव फेटाळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून लंडनला पळालेले मद्यसम्राट विजय मल्ल्यांना देशात आणि परदेशात त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण संपत्ती २१ एप्रिलपर्यंत जाहीर करण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. परतीची तारीख सांगा व न्यायालयासमोर कधी हजर होणार तेही कळवा, असे निर्देशही मल्ल्यांना देण्यात आले आहेत.

मल्ल्यांकडे १७ बँकांचे ९००० कोटींचे कर्ज थकले आहे. या प्रकरणात तडजोड ‘गंभीर’ असल्याचे सिद्ध करण्यासाठी ‘पुरेशी रक्कम’ जमा करण्यासही मल्ल्यांना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, कोणत्या बँकेचे किती आहे कर्ज