आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यवधींचा गंडा घालणारे मजा करताहेत आणि 5 साड्यांच्या चोरीचा आरोपी तुरुंगात आहे : SC

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माल्यांवर बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज आहे. ते गेल्या वर्षी 2 ला लंडनला पळून गेले होते. सरकारने त्यांना फरार घोषित केले आहे. (फाइल) - Divya Marathi
माल्यांवर बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज आहे. ते गेल्या वर्षी 2 ला लंडनला पळून गेले होते. सरकारने त्यांना फरार घोषित केले आहे. (फाइल)
नवी दिल्ली - 5 साड्या चोरल्याच्या आरोपात एका वर्षापासून तुरुंगात कैद असलेल्या एका व्यक्तीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने तेलंगणा सरकारला खडसावले आहे. कोर्टाने म्हटले, जो व्यक्ती कोट्वधी घेऊन फरार झाला आहे तो मजा करतोय. दुसरीकडे 5 साड्या चोरी केल्याचा आरोप असणारा तुरुंगात कैदेत आहे. माल्यांवर बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज आहे. ते गेल्या वर्षी 2 ला लंडनला पळून गेले होते. सरकारने त्यांना फरार घोषित केले आहे. (फाइल)

पत्नीने दाखल केली होती याचिका 
- आरोपी एलियाच्या पत्नीने याचिका दाखल केली होती. 5 साड्या चोरल्याचा आरोप असलेल्या तिच्या पतीना कोणतीही सुनावणी न करता कोठडीत ठेवण्यात आल्याचे या याचिकेत म्हटले होते. 
- हैदराबादमध्ये पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून आरोपीला मार्च, 2016 मध्ये अटक केली होती. 
- सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश जेएस खेहर म्हणाले की, जो व्यक्ती कोट्यवधी घेऊन फरार झाला तो मजा करतोय. पण ज्याने 5 साड्या चोरल्या तो तुरुंगात आहे. मात्र खेहर यांनी माल्यांचे नाव मात्र घेतले नाही. 

राज्य सरकारचे स्पष्टीकरण 
- सुनावणीदरम्यान तेलंगणा सरकारने या प्रकरणी झालेली अटक योग्य असल्याचे म्हटले आहे. 
- सरकारकडून दिलेल्या स्पष्टीकरणात आरोपी साड्या चोरी करणाऱ्या गँगचा सदस्य असून त्याच्या विरोधात अनेक व्यापाऱ्यांच्या तक्रारी होत्या असे सांगण्यात आले. 
- पोलिसांनी खबरदारी म्हणून आणि भविष्यात अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याला अटक केल्याचे स्पष्टीकरण दिले. 
- यापूर्वी राज्य सरकारने म्हटले होते की, आरोपीला आंध्रप्रदेश प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटीज ऑफ बूटलॅगर्स,  ड्रग ऑफेंडर्स, गुंडाज अॅक्ट अंतर्गत अटक केली होती. 
- सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी सुनावणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढील सुनावणी 8 मार्चला होणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...