आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिव्ह इन रिलेशन हा गुन्हा नव्हे : काेर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन संबंध स्वीकारले जात आहेत. यामुळे अशा संबंधात राहणे हा गुन्हा नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सार्वजनिक आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींचे लिव्ह इन नाते उजागर केल्यास अब्रुनुकसानीचा खटला चालवता येतो का, असा प्रश्न कोर्टाने सरकारला केला. त्याला उत्तर देताना अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले, सार्वजनिक आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींच्या खासगी आयुष्यात डोकावले जाऊ नये, कारण यामुळे कोणतेही सार्वजनिक हित साधले जाऊ शकत नाही. रोहतगी गुन्हेगारी अब्रुनुकसानीचा कायदा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेला विरोध करत होते. अब्रुनुकसानीचा कायदा हटवल्यास समाजात अराजक निर्माण होईल, असा युक्तिवाद रोहतगी यांनी केला.