आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाती-धर्माच्या आधारावर मते मागता येणार नाही, प्रचारात धर्माचा वापर बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो. - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो.
नवी दिल्ली - धर्म, पंथ, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर मते मागणे निवडणूक कायद्यांतील तरतुदींनुसार भ्रष्ट मार्ग असल्याचा निवाडा सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दिला.

लोकप्रतिनिधी कायद्यात भ्रष्ट मार्ग परिभाषित करणाऱ्या कलम १२३(३)मध्ये वापरलेल्या ‘त्याचा धर्म’ शब्दाच्या संदर्भात सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर व तीन अन्य न्यायमूर्तींनी चार विरुद्ध विरुद्ध तीन अशा बहुमताने निर्णय दिला. मतदार, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधींसह सर्वांचा धर्म व जाती संदर्भात हा शब्द वापरल्याचे या निर्णयात म्हटले आहे. मात्र  त्याचा धर्म या शब्दाचा प्रयोग उमेदवाराचा धर्माशी संबंधित आहे, असा यू. यू. ललित, ए. के. गोयल व डी. वाय चंद्रचूड या तीन न्यायमूर्तींचा अल्पमतातील अभिप्राय होता. अशा मुद्द्यांचा विचार करताना धर्मनिरपेक्षता विचारात घेतली पाहिजे, असा चार न्यायमूर्तींचा बहुमता अभिप्राय होता.

धर्म, जात, पंथ, समुदाय व भाषेच्या आधारावर मते मागणे किंवा मतदान करू नका, असे सांगणे भ्रष्ट मार्ग आहे की नाही, याबाबत निवडणूक कायद्यातील तरतुदींच्या कक्षेबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २७ ऑक्टोबरला राखून ठेवला होता.  भ्रष्ट मार्गाबाबतचे कायद्याच्या कलम १२३ (३) मध्ये वापरलेला ‘त्याचा धर्म’ शब्द केवळ उमेदवाराशी संबंधित आहे, असे आधीच्या निकालात म्हटले होते.

धर्माचे मात्र स्वातंत्र्य : धर्म मानण्याचे आणि त्याचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, धर्माचा वापर निवडणूक उद्देशासाठी केला जाऊ शकतो का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने केला आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...