आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक आयएनएस विक्रांतच्या लिलावास सुप्रीम कोर्टाची तूर्तास स्थगिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नौदलाच्या आयएनएस विक्रांत या ऐतिहासिक जहाजाचा लिलाव करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास सुप्रीम कोर्टाने तूर्तास स्थगिती दिली आहे. या जहाजाचे संग्रहालयामध्ये रुपांतर करून जतन करण्याची मागणी होत होती.
आयएनएस विक्रांत या जहाजाच्या साक्षीने देशाने गौरवाचे अनेक क्षण अनुभवले आहेत. त्यामुळे या जहाजाचे जतन करण्यासाठी त्याचे संग्रहालयात रुपांतर करण्याची मागणी समाजाच्या विविध स्तरांतून केली जात होती. मात्र, त्यासाठी येणारा खर्च परवडणारा नसल्याने सरकारने ही मागणी फेटाळली होती. तसेच या जहाजाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. त्या विरोधात दाखल एका याचिकेवरील सुनावणीप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाने या जहाजाचा लिलाव करण्यास तूर्तास स्थगिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या लिलावात या जहाजाची 60 कोटी रुपयांत एका कंपनीला विक्री करण्यात आली होती.