आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Stays To Release Four More Convicts In Rajiv Gandhi Assassination Case

राजीव गांधींच्या इतर चार मारेकर्‍यांच्या सुटकेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सात मारेकर्‍यांची सुटका करण्याचा निर्णय घेताना तामिळनाडू सरकारने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला नसल्याचे नोंदवून सुप्रीम कोर्टाने या सुटकेला स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवर हा आदेश देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारला नोटीस बजावून इतर चार दोषींच्या सुटकेला स्थगिती दिली आहे.

राजीव हत्येतील दोषी मुरुगन, संथन आणि पेरारिवलन यांच्या सुटकेला न्यायालयाने आधीच स्थगिती दिली होती, उर्वरित चार दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने मुरुगन, संथन आणि पेरारिवलन या तिघांची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेप सुनावली होती. यावर घटनात्मक अधिकारांचा वापर करून तमिळनाडू सरकारने या हत्येतील सर्व सात दोषींची मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता.
सर्वोच्च न्यायालयाने मुरुगन, संथन आणि पेरारिवलन यांची फाशी जन्मठेपेत बदलली आहे. त्यानंतर तमिळनाडू सरकारने सात दोषींची मुक्तता करण्याचे आदेश दिले. यात जन्मठेप भोगणारे मुरुगनची पत्नी नलिनी, रविचंद्रन, रॉबर्ट पायस व जयकुमारचाही समावेश आहे. यांच्या सुटकेला आज (गुरुवार) स्थगिती देण्यात आली आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, आतापर्यंत काय-काय झाले..