आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • SC To Hear Plea For Candidates Charged Under Serious Offences Not Contest Elections

कलंकित उमेदवारांवर निर्णय घेणार सुप्रीम कोर्ट, 5 न्‍यायाधिशांची समिती स्‍थापन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुक प्रक्रीया सुधारणेसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. - Divya Marathi
निवडणुक प्रक्रीया सुधारणेसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे.
नवी दिल्‍ली - गंभीर गुन्‍ह्यांचा आरोप असलेल्‍या उमेदवारांना लवकरच सुप्रीम कोर्टाचा झटका बसू शकतो. कारण अशा उमेदवारांच्‍या भवितव्‍याबाबत सुप्रीम कोर्ट येत्‍या निवडणुकांआधीच निर्णय घेण्‍याची शक्‍यता आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक सुधारणेसंबंधी एक याचिका दाखल झाली आहे. विविध आरोपांचा कलंक असलेल्‍या उमेदवारांना निवडणुकीत उभे राहण्‍यास बंदी घालावी अशी मागणी याचिकेत करण्‍यात आली आहे. याचिकेवर निर्णय घेण्‍यासाठी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (दि. 5 जानेवारी) 5 न्‍यायाधिशांची समिती स्‍थापन केली आहे. 4 फेब्रुवारीपासून उत्‍तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्‍तराखंड, मणिपूर या पाच राज्‍यात विधानसभा निवडणुका सुरु होत आहे. अशावेळी सुप्रीम कोर्टाचा निकालाने अनेक बाहुबलींना धक्‍का बसू शकतो. सुप्रीम कोर्टाने नूकताच निर्णय दिला आहे की, उमेदवाराला जाती, धर्म, भाषा, पंथ या आधारे मते मागता येणार नाहीत. असे करणे कायद्याने गुन्‍हा आहे. गुन्‍हा सिध्‍द झाल्‍यास उमेदवारांची निवडणुकही रद्द होऊ शकते. 
सुप्रीम कोर्टने म्‍हटले आहे की, निवडणूक ही धर्मनिरपेक्ष प्रक्रीया आहे.
 
- हिंदुत्‍वाच्‍या मुद्दयावर काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. 
- यावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता की, उमेदवार निवडणुकांमध्‍ये जाती, धर्म, भाषा आणि पंथ याआधारे मते मागू शकत नाही. 
- निवडणूक ही धर्मनिरपेक्ष प्रक्रीया आहे. याचे सर्वांनी पालन केले पाहिजे. 
- यावेळी कोर्टाने म्‍हटले होते की, र्इश्‍वर आणि माणसाचे नाते, ही व्‍यक्तिगत बाब आहे. सरकारने अशा गोष्‍टींपासून स्‍वत:ला दुर ठेवले पाहिजे. 
- हिंदुत्‍वाच्‍या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे सरन्‍यायाधिश टी.एस. ठाकूर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली न्‍यायमूर्ती एम.बी. लोकूर, न्‍यायमूर्ती एन.एल. राव, न्‍यायमूर्ती एस.ए. बडे, न्‍यायमूर्ती यू.यू. ललित, न्‍यायमूर्ती ए.के. गोयल, न्‍यायमूर्ती डी.वाय चंद्रगूड यांच्‍या खंडपीठाने हा निर्णय दिला होता. 
- सरन्‍यायांधिशासहित 4 न्‍यायमूर्तींनी जाती, धर्म, भाषेच्‍या आधारावर मत मागणे म्‍हणजे भ्रष्‍ट आचार असल्‍याचे म्‍हटले होते. 
- उर्वरित 3 न्‍यायमूर्तींनी, न्‍यायमूर्ती यू.यू. ललित, न्‍यायमूर्ती ए.के. गोयल आणि न्‍यायमूर्ती डी.वाय चंद्रगूड यांनी यास विरोध दर्शविला होता.   
 
आगामी निवडणुकांवर या निकालाचा काय परिणाम होऊ शकतो. 
- पुढील दोन महिन्‍यात उत्‍तर प्रदेश, पंजाब, उत्‍तराखंड, मणिपूर आणि गोवा येथे विधानसभा निवडणुका होत आहेत. येथे या निकालाचा थेट परिणाम होऊ शकतो. 
- यापुढील कोणत्‍याही निवडणुकीमध्‍ये नेते, उमेदवार जाती, धर्म, भाषा आणि पंथ याआधारे मते मागू शकणार नाहीत. तसे आढळल्‍यास त्‍यांची निवडणूक रद्द होऊ शकते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)     
 
बातम्या आणखी आहेत...