आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या चार वर्षानंतर दलित मुलगा व ब्राह्मण मुलीला सुप्रीम कोर्टाने भेटवले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जातीधर्मात अडकलेल्या आपल्या समाजात एका प्रेमी जोडप्याला सुप्रीम कोर्टाने लग्नानंतर चार वर्षानंतर एकत्र आणले आहे. संबंधित मुलगी ब्राह्मण समाजातील आहे तर मुलगा दलित समाजातील. उत्तर प्रदेशातील बहराइच येथील हे जोडपे आहे. दलित मुलगा व उच्चवर्गीय मुलीत प्रेमसंबंध निर्माण झाले व त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र मुलीचे वय त्यावेळी 18 वर्ष नव्हते. त्यामुळे कायद्याच्या कसोटीवर हे लग्न बेकायदेशीर ठरत होते. मात्र, आता चार वर्षानंतर आता या जोडप्याला एकत्र राहण्याची परवानगी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिली आहे.
यूपीतील बहराइच येथे या मुला-मुलीचे घर समोरासमोर आहे. या दोघांत प्रेम जमले. त्यावेळी मुलीचे वय 15 वर्ष होते तर मुलाचे 20 वर्ष. मात्र, तरीही या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, घरच्या मंडळींना हे नाते पसंत नव्हते. कारण मुला-मुलीची जात वेगळी. युवक दलित जातीतील होता तर युवती ब्राह्मण समाजातील होती. मुलीच्या घरच्यांचा विरोध होता तर आपल्या कुटुंबियांच्या जीवाला निर्माण होईल म्हणून त्यांनीही विरोध केला. मात्र, मुला-मुलीने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. जवळच असलेल्या एका मंदिरात जाऊन या जोडप्याने 2011 मध्ये पळून जाऊन लग्न केले.
मात्र, या जोडप्याला दोन्ही घरच्यांनी घरी घेतले नाही. त्यामुळे लग्नानंतर एक महिन्याने मुलीच्या पालकांनी मुलीचे अपहरण केल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या आरोपाखाली संबंधित तरूणाला पोलिसांनी तुरुंगात डांबले.
काही महिन्यानंतर संबंधित प्रियकराला जामीन मंजूर झाला. मात्र, प्रकरण थोडेचे संपले होते. संबंधित तरूणीने मी माझ्या मर्जीने प्रियकरासह पळून गेले होते असे सांगितल्यानंतरही अलाहाबाद हायकोर्टाने हा खटला रद्द करण्यास नकार दिला होता. त्यानंतर संबंधित दलित तरूणाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. अखेर चार वर्षांनी या दोघांना सुप्रीम कोर्टाने न्याय दिला आहे.
दरम्यान, मधल्या काळात सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर संबंधित युवतीला मुलींच्या शासकीय सुधारगृहात ठेवण्यात आले होते. अखेर सुप्रीम कोर्टाने तरूणाकडून मुलीचा व्यवस्थित संभाळण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन त्यांच्या लग्नाला रीतसर परवानगी दिली व सुखी संसार करण्यास सांगितले.