आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Verdict In Naina Sahni Tandoor Murder Case Today

तंदूर हत्याकांड: सुशील शर्माला दिलासा, फाशी बदलली आजीवन कारावासात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या नयना सहानी-शर्मा तंदूर हत्याकांडप्रकरणी सुप्रीम कोर्टाने युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सुशील शर्मा यांना दिलासा दिला आहे. फाशी रद्द ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली एका पीठाने आज (मंगळवारी) हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सुशील याला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची ‍शिक्षा आजीवन कारावास असल्याचेही कोर्टाने निकाल देताना स्पष्ट केले आहे.

सुशील शर्मांना यापूर्वी विशेष कोर्ट आणि हायकोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. सुशील शर्मा यांनी त्यांची पत्नी नयना सहानी शर्मा हिची हत्या करून तिचा मृतदेह तंदूरमध्ये जाळला होता.

विशेष कोर्टाने सुशील शर्मा यांना दोषी ठरवत नोव्हेंबर 2003 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. डिसेंबर 2003 मध्ये सुशील शर्मा यांनी या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात अपील दाखल केले होते. मात्र दिल्‍ली हायकोर्टाने त्यांना दोषी ठरवत विशेष कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. हायकोर्टाने या प्रकरणी त्यांचा साथीदार आणि आरि बगिया रेस्टॉरंटचा मालक मलिक केशव कुमार याला पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.