आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Scale Down Relations With Pakistan: BJP President Rajnath Singh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांनी शरीफ यांच्याशी चर्चा करू नये - राजनाथसिंह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी नियोजित भेट रद्द करावी, असे मत भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मांडले. पुढच्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये होणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सिंह व शरीफ यांची भेट होणार आहे.

पाकिस्तानबरोबर चर्चा केव्हापर्यंत सुरू राहणार, असा सवाल सिंह यांनी रविवारी केला. भाजपतर्फे रामलीला मैदानावर आयोजित वीजदराविरोधी आंदोलनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. सीमेवरील हालचाली पूर्णपणे बंद होईपर्यंत कोणतीही चर्चा व्हायला नको, असेही ते म्हणाले. त्यांच्याबरोबर कोणतेही राजकीय संबंधही नको, असेही ते म्हणाले. दोन जवानांची हत्या झाली त्या वेळीच सरकारने कठोर पावले उचलली असती तर ही वेळच आली नसती, असेही ते म्हणाले.