नवी दिल्ली - अंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत अभिषेक गोस्वामीने नवी विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने केवळ 76 चेंडुत 255 धावांची नाबाद खेळी केली.बारखंबा रोड येथील मॉडर्न स्कुलच्या अभिषेकने आंध्रा एज्यूकेशन सोसायटी शाळेविरोधात खेळाताना 76 चेंडूत 27 षट्कार आणि 18 चौकारांच्या मदतीने अडिचशेपेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला.
अभिषेक राइड हँड्स बॅटसमॅन आहे. त्याने एकांशसोबत (91 धावा)
15.1 षटकात 296 धावांची भागीदारी केली. आजपर्यंतच्या टी-20 क्रिकेटमधील हा विक्रम मानला जात आहे. 17 वर्षांच्या अभिषेकने शाळेच्या मैदानावर खेळायला सुरुवात केल्यानंतर त्यालाही अंदाज नव्हता की तो सलग 20 ओव्हर खेळेल आणि धावांचा पाऊस पाडेल.
टी-20 क्रिकेटमधील टॉप पाच विक्रम
अभिषेक गोस्वामी - 255
क्रिस गेल - 175*
ब्रँडन मॅक्क्युलम - 158*
आरोन फिंच - 156
लूक राइट - 153*