आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SDM Report Confirms Poisoning, Tharoor May Be Questioned

सुनंदा मृत्यू प्रकरणावरून राष्ट्रवादीचा युपीएवर हल्ला, थरुर यांच्या राजीनाम्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरुर यांच्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस यूपीए आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डी.पी.त्रिपाठी यांनी सुनंदा थरुर यांच्या मृत्यूची चौकशी सुरु असे पर्यंत थरुर यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यासोबत थरुर यांचे संबंध असल्याचा आरोप सुनंदा यांनी मृत्यूआधी काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यानंतर सुनंदा यांचा मुलगा शिव मेनन यानेही माझी आई आत्महत्या करु शकत नाही, असा दावा केला आहे. त्याच्या मते सुनंदा या खंबिर आणि कणखर महिला होत्या.
सुनंदा यांच्या पोस्टमॉर्टम अहवालात त्यांच्या मृत्यूचे कारण अनैसर्गिक असल्याचे आणि विषामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. अशा वेळी संशयाची सुई ही थरुर यांच्याकडे वळत आहे. त्यामुळे ते मंत्रीपदावर राहिल्यास चौकशीत अडथळा येऊ शकतो, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला आहे. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात डी.पी.त्रिपाठी म्हणाले, सुनंद यांच्या मृत्यूची चौकशी पूर्ण होई पर्यंत थरुर यांनी मंत्रिमंडळा बाहेर राहाणे योग्य आहे.