आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्राच्या 7 किमी खालून धावणार बुलेट ट्रेन, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ठरलेल्या मुदतीच्या आधीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन योजनेचे काम याच महिन्यात सुरू होणार आहे. भारत व जपानचे पंतप्रधान १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान अहमदाबादमध्ये या प्रकल्पाचा शिलान्यास करतील. १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी यांचा, तर २१ सप्टेंबरला जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे दोघांच्या वाढदिवसादरम्यानच्या तारखेस या प्रकल्पाचे उद््घाटन होऊ शकते. ५०८ किमी अंतराच्या या बुलेट ट्रेनचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त हे काम १५ ऑगस्ट २०२२ पर्यंतच पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. प्रथमच या प्रकल्पासाठी समुद्राच्या खाली रेल्वेमार्ग बनवला जाईल. २१ किमीच्या भूमिगत मार्गापैकी ठाणे ते मुंबईदरम्यान ७ किमी अंतर समुद्राखाली असेल.  

- स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त देशवासीयांना भेट देण्यासाठी वर्षभरापूर्वीच प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू  
- एकूण २१ किमी लांब भुयारी मार्ग, ठाणे ते मुंबईदरम्यान ७ किमी मार्ग समुद्राखालून जाईल  
- 12 स्टेशन मुंबई ते अहमदाबाद प्रत्येक स्टेशनवर २.४५ मिनिटांचा थांबा  

बुलेट ट्रेनचे मेगाबजेट  
-  १.१० लाख कोटी रुपये एकूण खर्च  
-  ८१% रक्कम जपान कर्ज देणार  
-  ०.१% व्याजाने कर्ज मिळेल  
-  ५० वर्षे कर्ज परतफेडीची मुदत  
-  १५ वर्षांपर्यंत कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही. 

जपानी आणि भारतीय कंपनीच करणार काम  
- बुलेट ट्रेनच्या प्रशिक्षणासाठी वडोदरामध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू होईल.  
- सिग्नलिंग आणि रेल्वेमार्गाचे काम जपान करेल. उर्वरित कामांसाठी निविदा काढल्या जातील. करारानुसार फक्त जपानी व भारतीय कंपन्याच हे काम करू शकतील.  
- पहिल्या आठवड्यापासूनच रोज ३६,००० प्रवासी प्रवास करणार.  
- मुंबई- अहमदाबादचा ६-७ तासांचा प्रवास २.०७ तासांवर येईल. 

नव्या रेल्वेमंत्र्यांचे प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याचे आदेश  
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुलेट ट्रेनचे काम वेळेवर पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यांनी पदभार स्वीकारल्यामुळे हे काम २०२२ पर्यंत पूर्ण होईल, असे म्हटले जाते.
बातम्या आणखी आहेत...