आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाराच्या सुब्रतो राय यांच्या मानगुटीवर अटकेची तलवार, पासपोर्टही होणार जप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सिक्युरिटीज एंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने सहाराचे प्रमुख सुब्रतो राय यांच्या अटकेसाठी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. या महिन्यात सेबीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सेबीने सहाराचे प्रमुख राय यांच्या कंपनींमध्ये गुंतवणुकदारांना त्यांचे 24 हजार कोटी रुपये परत देण्यास सांगितले आहे. सेबी सहारा समूहाच्या दोन संचालकांसह सुब्रतो राय यांचा पासपोर्ट सोबी जप्त करु इच्छित आहे.

सेबीने मागील महिन्यात सहारा समूहाच्या दोन कंपनीची आणि सुब्रतो राय यांच्यासह काही प्रमुख अधिका-यांची बॅंक खाते सील करण्याचा आणि त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यास सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सेबीने सहाराला बजावले होते. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, सहारा समूहाच्या कंपन्या गुंतवणुकादारांचा पैसा परत करणार नसेल तर सेबी त्यांची संपत्ती जप्त करु शकते. तसेच त्यांच्या खात्यांना सील करण्यात यावे.

सेबीने सहारा समूहाच्या सहारा हाऊसिंग इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सहारा इंडिया रियल स्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड या दोन कंपन्यांच्या विरोधात वेग-वेगळे आदेश दिले आहेत. आदेशात सेबीने म्हटले आहे की, दोन्ही कंपनीत गुंतवणुकदारांच्या सुमारे 6, 380 कोटी आणि 19, 400 कोटी रुपयांची अनियमितता आढळून आली आहे.