आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parliament Budget Session Second Part Second Day LIVE

राज्यसभेत #Uttarakhand वरुन गोंधळ, मोदीविरोधी घोषणाबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारी सुरुवात झाली तेव्हा पंतप्रधान म्हणले होते,आशा आहे की चांगले निर्णय होतील. - Divya Marathi
अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारी सुरुवात झाली तेव्हा पंतप्रधान म्हणले होते,आशा आहे की चांगले निर्णय होतील.
नवी दिल्ली - संसदेत मंगळवारी कामकाजाची सुरुवात राष्ट्रपती नियुक्त सदस्यांच्या शपथविधीने झाली. त्यानंतर राज्यसभेत मोठा गदारोळ सुरु झाला. उत्तराखंडच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली. त्याआधी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले होते, की उत्तराखंडमध्ये राज्य सरकार अल्पमतात होते, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राज्यसभेचे कामकाज 12 वाजतापर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले, धरणांचा फायदा हा फक्त साखर कारखान्यांना

लोकसभेत दुष्काळावर प्रश्नोत्तरे
- लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दुष्काळासंबंधीच्या प्रश्नांनी खासदारांनी सरकारला धारेवर धरले आहे.
- भाजप खासदार सोनाराम यांनी दुष्काळासंबंधी प्रश्न उपस्थित केला. राजस्थानमध्ये 19 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे.
- राज्यसभेत देशातली दुष्काळावर बुधवारी चर्चा होणार आहे. देशातील 10 राज्यांमध्ये दुष्काळामुळे बिकट स्थिती निर्माण झाली आहे.
- राज्यसभेत काँग्रेस नेते गुलामनबी आझाद आणि समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर चर्चेला उप सभापती पी.जे. कुरियन यांनी मंजूरी दिली.
- दरम्यान, महाराष्ट्रातील दुष्काळावर केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह म्हणाले, महाराष्ट्रातील परिस्थिती भयंकर आहे.
- 'राज्यातील धरणांचा फायदा हा फक्त साखर कारखान्यांना झाला.'

स्वामी - मेरी कोम राज्यसभा सदस्य
- भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी आणि बॉक्सर मेरी कोम यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.


संसदेत सोमवारी काय झाले होते


- काँग्रेस, डावे, जेडीयूसह विरोधी पक्षांनी उत्तराखंड मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला.
- गोंधळामुळे लोकसभेत शुन्य प्रहर आणि प्रश्नोत्तरांचा तास होऊ शकला नाही. तर, राज्यसभेचे कामकाज दिवसभर स्थगित करावे लागले.
- लोकसभेत शुन्य प्रहरात काँग्रेसचे संसदीय पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा उपस्थित केला.
- त्यांनी सरकारला 'लोकशाहीचे खूनी' म्हटले होते. ते म्हणाले, सरकार जिथे भाजपचे शासन नाही अशा राज्यातील सरकार पाडण्याचे षडयंत्र रचत आहे.
- राज्यसभेत काँग्रेसने उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्द्यावर चर्चेची मागणी केली होती. काँग्रेसचे आनंद शर्मा म्हणाले, 'सरकारने अरुणाचलमध्ये लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारला अस्थिर केले. आता उत्तराखंडमध्ये सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू केली.'
- काँग्रेस सदस्यांनी “मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी’, “मोदी सरकार होश में आओ’ अशा घोषणा दिल्या.
पुढील स्लाइडमध्ये,
>> माल्यांचे काय होणार
>> ओवेसी का पायी चालत आले