आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security And Other Preparations For Modi\'s Oath Ceremony Are In Final Stage

सकाळी 10.45 वाजता येणार शरीफ; शपथविधी सोहळ्याआधी राजधानीत पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि्ल्ली - नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे राष्ट्र प्रमुख 45-45 मिनीटांच्या फरकाने भारतात दाखल होणार आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपक्षे सोमवारी सकाळी 10 वाजता भारतात येतील. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ 10.45 वाजता तर, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हामिद करझाई 11.30 वाजता पोहोचतील. दुसरीकेड नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, 'सार्क देशाचे राष्ट्रप्रमुख सोहळ्यासाठी उपस्थित राहाणार ही आनंदाची बाब आहे. त्यांची उपस्थिती या सोहळ्याला 'यादगार' करेल.'
शपथविधी सोहळ्याची तयारी रविवारी सायंकाळी शेवटच्या टप्प्यात आली असताना राजधानीत पावसाने हजेरी लावली. यामुळे प्रशासनाने सोहळ्यासाठी 'प्लॅन बी' तयार केला आहे. सोमवारी सायंकाळीही दिल्लीत वरुण राजा बरसण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने राष्ट्रपती भवनात कार्यक्रम घेण्याची तयारी केली आहे.
मोदींच्या शपथविधीसाठी देश-विदेशातील जवळपास 3500 लोक उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था कडेकोट असल्याचे तपासण्याचेही काम यंत्रणेने रविवारी केले. नवी दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी स्नॅपर आणि कमांडोज् तैनात करण्यात आले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीच्या अखेरच्या टप्प्याची छायाचित्र....