आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security And Other Preparations For Modi\'s Oath Ceremony Are In Final Stage

मोदींच्या शपथविधीला RSSचे खास आकर्षण; 30 मुस्लिम नेते राहणार उपस्थित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- देशाचे 15 व्या पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. मोदींसह 45 (सोमवार) मंत्री शपथ घेणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमात राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाची (आरएसएस) भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सर्व धर्मगुरु उपस्थित राहावे, अशी मनिषा संघाच्या नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार देशातील 30 मुस्लिम नेत्यांना मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्‍यात आले आहे. यापैकी काही मुस्मिम नेते दिल्लीत पोहोचले आहे. याशिवाय ख्रिश्चन धर्मगुरूंना कार्यक्रम पत्रिका पाठवण्यात आली आहे.

मुस्लिम राष्‍ट्रीय मंचसोबत काम करणारे माजी संघ प्रचारक गिरीश जुयाल यांनी वरील वृत्ताला दुजोरा दिला आहे. निमंत्रण पाठवण्यात आलेले बहुतेक नेते हे मुस्लिम राष्‍ट्रीय मंचाचे सदस्य आहेत. जुयाय यांच्यामते, केंद्रात सत्तेवर येणारे सरकार हे मुस्लिम विरोधी नसल्याचा यातून संघाला देशात संदेश द्यायचा आहे. याशिवाय काही धार्मिक नेते आहे. परंतु, यापैकी काही मुस्लिम नेते मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, मोदींच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी...