आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security Cover And Other Vvip Facilities Of Robert Vadra Can Be

रॉबर्ट वढेरांची झेड प्लस सुरक्षा काढणार, विमानतळावरील चौकशीतील सूटही रद्द होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - कॉंग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या अनेक व्हीव्हीआयपी सुविधा काढून घेतल्या जाण्याची शक्यता आहे. नव्या सरकारने याबाबत संकेत दिले आहेत. वढेरा यांनी झेड प्लस सुरक्षा मिळते. गृहमंत्रालय 25 व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेचा आढावा घेणार असून, त्यात रॉबर्ट वढेरांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
वढेरा यांना भारतीय विमानतळांवर चौकशीतून सूट मिळालेली आहे. अशी सूट केवळ व्हीव्हीआयपींना दिली जाते. त्यांची यादी विमानतळावर लावलेली असते. या यादीत वढेरांचे नाव आहे. पण त्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नाही. या मुद्यावरुन दोन वर्षांपूर्वीही वाद झाला होता. वढेरा यांना राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, मंत्री, मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ न्यायाधीशांप्रमाणे सुविधा मिळाल्या आहेत.

प्रत्येकाची चौकशी व्हावी : सरकार
हवाई वाहतूक मंत्री गणपती राजू यांनी गुरुवारी विमानतळांवर प्रत्येकाची चौकशी व्हायलाच हवी, असे म्हटले होते. सरकार याबाबत विचार करणार असल्याचेही ते म्हणाले होते. सुरक्षा गरजेसाठी असावी, दिखावा करण्यासाठी नव्हे. जर त्यांना (रॉबर्ट वढेरा) यांना धोका असेल तर ठीक आहे. पण प्रत्येकाची चौकशी व्हायलाच हवी, असेही ते म्हणाले. भाजपने प्रचारातही वढेरांवर चांगलाच हल्लाबोल केला होता. सत्ता आल्यास बदला घ्यायचा म्हणून कोणावर कारवाई करणार नाही, मात्र कायद्याप्रमाणे कारवाई होणारच असे मोदींनी आधीच म्हटले होते.
पुढे वाचा - काँग्रेसचे मत काय? राजीव गांधी विमानतळाचे नावही बदलण्याची शक्यता