आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security Guard For Arvind Kejriwal Cabinate Ministers

अरविंद केजरीवालांनी रचला इतिहास; \'आप\'च्या मंत्र्यांना मिळणार \'बॉडीगार्ड\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत:ची सुरक्षा नाकारली आहे. परंतु, ते मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना सुरक्षा देण्याच्या विचारात आहेत. केंद्र सरकारनुसार, प्रत्येक मंत्र्यांना किमान एक सुरक्षा रक्षक देण्यात यावा. याबाबत येत्या काही दिवसात दिल्ली पोलिसांकडून 'आप'च्या मंत्र्यांना सुरक्षारक्षकाचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे दिल्ली पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीतील मंत्रिमंडळातील प्रत्येक नव्या मंत्री महोदयांना किमान एक सुरक्षारक्षक देणे आवश्यक आहे. मंत्र्यांना अनेक कार्यक्रमांना जावे लागते. राज्यात दौरे करावे लागतात. त्यामुळे त्यांना सुरक्षा देणे गरजेचे असल्याचेही गृह मंत्रालयातर्फे पोलिसांना सुचित करण्‍यात आले आहे. मात्र, केजरीवाल यांनी यापूर्वी सुरक्षा व्यवस्था नकारली होती.

किमान सुरक्षा आवश्यक... वाचा पुढील स्लाइड्‍सवर...