आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Security Increased Security At Delhi's Airport And Metro Ahead Of Independence Day

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानी कुरापतींचे स्वातंत्र्य दिनावर सावट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रोमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), दिल्ली पोलिस व केंद्र सरकारच्या अन्य सुरक्षा संस्थांचे जवान सुरक्षा व्यवस्थेत आहेत. याबरोबर अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घेतली जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे, घाबरण्याचे कारण नाही, असे वरिष्ठ सुरक्षा अधिकार्‍याने सांगितले. विमानतळावर प्रवासी व वाहनांची तपासणी केली जात आहे. संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेता प्रवाशांची अचानक तपासणी केली जात आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील जवान तैनात करण्यात आले आहेत.