आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा घड्याळ बनवण्यास खासगी कंपन्यांना मुभा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- महिलांच्या सुरक्षेसाठी घड्याळ तयार करण्याच्या कामात व्यग्र असलेल्या केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने त्यासंबंधीचे तंत्रज्ञान खासगी कंपन्यांसोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी घड्याळ उत्पादक कंपन्याही त्यामुळे घड्याळ निर्मिती करू शकतील, परंतु त्याची त्या मनमानी प्रकारे विक्री करू शकणार नाहीत.

मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकार विविध उपाययोजना करत आहे. हे बहुउपयोगी घड्याळ त्याच उद्देशाने सरकारने विकसित केले आहे. मंत्रालयाचा उद्देश हे सुरक्षा घड्याळ मोठय़ा प्रमाणात सर्वत्र उपलब्ध करून देणे हा आहे. त्यासाठी मंत्रालयाअंतर्गत काम करणार्‍या सी-डॅकसह इतर खासगी कंपन्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून घड्याळ विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजधानी दिल्लीत डिसेंबर 2012 मध्ये सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने असे घड्याळ विकसित करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. यात एखादी महिला अडचणीत सापडली असेल तर ती घड्याळाच्या माध्यमातून पोलिस तसेच जवळच्या नातेवाइकांना संदेश पाठवून धोक्याची सूचना पाठवू शकते. व पोलिस तिच्या मदतीसाठी धावून जाऊ शकतील. हे घड्याळ संबंधित महिलेचे लोकेशन सांगण्यासोबतच आवाजाच्या संदेशाद्वारे धोक्याचा इशारा देईल.

रथम सुरक्षा घड्याळाद्वारे पाठवलेला संदेश एसएमएस केंद्र व ग्लोबल पोझिशनिंग केंद्रापर्यंत जाईल. तेथून तो पोलिस नियंत्रण कक्षाकडे पाठवला जाईल. त्यानंतर पीसीआर व्हॅनला त्याची सूचना दिली जाईल.

वर्षअखेरीपर्यंत घड्याळ उपलब्ध
केंद्रीय दूरसंचार, माहिती, तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले की या घड्याळाची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणारी असेल. तसेच या वर्षअखेरीपर्यंत ती बाजारात प्रयोगासाठी उपलब्ध असेल.

डिव्हाइस आणण्याचाही प्रयत्न
सिब्बल यांनी ‘दिव्य मराठी नेटवर्क’शी बोलताना सांगितले की, त्यांनी एका बैठकीत याचे प्रोटो - टाइप परीक्षण केले. त्यात हे घड्याळ पोलिस नेटवर्कशी जोडण्यासंदर्भात झालेल्या प्रगतीची अधिकार्‍यांकडून माहिती घेतली. महिला सुरक्षा घड्याळ एक डिव्हाइस म्हणून बाजारात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.