आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sedition Case: SC Rejects Hardik Patel\'s Plea, To Remain In Jail

हार्दिक पटेलच्‍या \'दिवाळी\'वर \'संक्रात\' ! सुप्रिम कोर्टाकडूनही दिलासा नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - सुरत पोलिसांनी दाखल केलेला देशद्रोहाचा आरोप रद्द करावा, या मागणीसाठी गुजरातमधील पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने याची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्‍यानंतर आज (शुक्रवार) सर्वोच्‍च न्‍यायालयाकडून हार्दिकला दिलासा मिळाला नाही. आपल्‍यावरील देशद्रोहाचा गुन्‍हा मागे घ्‍यावा, अशी मागणी हार्दिकने सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे केली होती. मात्र, सुरत पोलिसांचा तपास पूर्ण झाल्‍यानंतरच हार्दिकच्‍या याचिकेवर विचार केला जाईल, असे सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान, पोलिसांनी दीड महिन्‍यात हा तपास पूर्ण करावा, असा आदेशही न्‍यायालयाने दिला. परिणामी, आता हार्दिक दिवाळीही तरुंगातून बाहेर जाऊ शकणार नसून, थेट सक्रांतीच्‍यादरम्‍यान त्‍याच्‍या याचिकेवर विचार होणार आहे.
5 जानेवारीला पुढील सुनावनी
या प्रकरणात आता पुढील सुनावनी 5 जानेवारीला होणार आहे. त्‍यामुळे तोपर्यंत तरी हार्दिकला तरुंगातच राहावे लागणार आहे. यापूर्वी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या एका बेंचने हार्दिकच्‍या याचिकेवर सुनावनी करण्‍यास नकार दिलाद होता. त्‍यामुळे तिला दुस-या बेंचकडे पाठवण्‍यात आले.
वडिलांनी दाखल केली होती याचिका
हार्दिकचे वडील भरत पटेल यांनी पुत्राच्या वतीने ही याचिका दाखल केली होती. हार्दिकने कोणताही गुन्हा केला नसल्याचे म्हटले आहे. हार्दिकने जे वक्तव्य केले त्यावरून कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही, त्यामुळे त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही, असे याचिकेत म्हटले होते.
काय आहे हार्दिकवर आरोप ?
आत्महत्या करण्याऐवजी पोलिसांना ठार मारा, असे वक्तव्य हार्दिक पटेलने करून समाजातील युवकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्‍या आधारे त्‍याच्‍या विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. शिवाय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याबद्दल राजकोट ग्रामीण पोलिसांनीही हार्दिकला अटक केली होती. हार्दिक याची जामिनावर सुटका होताच सुरत पोलिसांनी त्याला देशद्रोहाच्या तक्रारीवरून अटक केली.