आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See How Arwind Kejriwal\'s Parents Campaign For Party In Elections

परिश्रमाचे फळ: केजरींच्या आई-वडिलांनी घराघरात जाऊन केला होता प्रचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: अरविंद केजरीवाल यांचे वडील गोविंद राम केजरीवाल आणि आई गीता देवी)

नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप) सगळ्यात मोठा राजकीय पक्ष उदयास आला आहे. 'आप'ने 67 जागांवर आघाडी मिळवली असून भाजपला मोठा फटका बसला आहे. कॉंग्रेसचे तर अस्तित्वच संपुष्टात आल आहे. 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या परिश्रमाचा हा विजय आहे. त्यामुळे दिल्लीतील विजयाचे सर्व श्रेय हे केजरीवाल यांनाच आहे.
दरम्यान, केजरीवाल यांचा प्रचार करण्‍यासाठी त्यांचे आई-वडील मैदानात उतरले होते. केजरीवाल यांचे वडील गोविंदराम आणि आई गीतादेवी यांनी घराघरात जाऊन मुलाचा प्रचार केला होता. 'आप'च्या अन्य उमेदवारांना देखील बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले होते. केजरींच्या आई-वडीलांच्या आशीर्वादाचे हे फळ आहे.
तसे पाहिले तर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 'आप' उमेदवारांबरोबरच त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला आहे. भाजपच्या नुपूर शर्मा यांनी केजरीवाल यांनी आव्हान दिले होते.

गोविंद राम आणि गीतादेवी या दोघांचे देखील केजरीवाल यांना विजय मिळवण्यासाठी मोलाचे योगदान आहे. दोघांनी दिल्ली परिसरात जोरदार प्रचार केला होता. दोघेही सकाळी 11 वाजता घरातून बाहेर पडत आणि रात्री 8 वाजेच्या पुढे घरी परत येत असता मतदारसंघात प्रचार करतात.

नुपूर शर्मा यांच्या प्रचारासाठी अन्य राज्यांतून त्यांचे नातेवाईक आले होते. नुपूर यांचे वडील विनय शर्मा, आई रुपाली यांच्याशिवाय देहराडूनहून आलेले त्यांचे मामा, मामी हेही प्रचार करत आहेत. त्याशिवाय आग्रा येथून नुपूर यांची मावशी संगिता, बिजनोरहून आलेले त्यांचे मामा अश्विनी महर्षी, मामी मृदुला आणि जयपूरची मावशी शशी हेही प्रचारात व्यस्त आहेत.
दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार किरण वालिया यांचा मुलगा समीर आणि सूनही प्रचारात उतरले आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, निवडणुकीचा प्रचार करताना अरविंद केजरीवाल यांचे आई-वडील