आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See In Pics: Delhi Chief Minister Arvind Kejriwal's New House

PICS: बघा, अरविंद केजरीवालचे नविन घर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली: दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल शनिवारी नविन घरामध्‍ये गृहप्रवेश केला. केजरीवालांनी सामान्‍य व्‍यक्‍तीसारखे राहण्‍याचे ठरविल्‍याने, ते सरकारी बंगल्‍यामध्‍ये राहणार की नाही? यावरुन बराच वाद झाला होता. चर्चेच्‍या फैरी झडल्‍या होत्‍या.

केजरीवालांचे नवे घर दिल्‍ली सचिवालयाच्‍या जवळ आहे. या फ्लॅटमध्‍ये तीन बेडरुम आहेत. दोन खोल्‍या नोकरांसाठी, एक ड्रॉइंग रुम, एक डायनिंग रुम आणि एक गॅरेज आहे. हा फ्लॅट 1600 स्‍क्वेअर फुटचा असून फ्लॅटच्‍या जवळच बगिचा आहे. केजरीवाल यांच्‍या नविन घराचा पत्‍ता- टिळक रोड सी-11/ 23 आहे. केजरीवाल पूर्वी कौशंबी येथील गिरणार अपार्टमेंटमध्‍ये 1995 पासून राहत होते. हा फ्लॅटसुध्‍दा तीन बेडरुमचा आहे. या घरामध्‍ये केजरीवाल त्‍यांच्‍या कुटुंबासमवेत राहत होते.