आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किती ग्लॅमरस होत्या सुनंदा पुष्कर; बघा, या सेलिब्रिटीची स्टायलिश छायाचित्रे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सुनंदा पुष्कर)
माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेस नेते शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर या मृत्युपश्चात पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. दिल्लीतील हॉटेल 'लीला पॅलेज'मधील एका रुममध्ये 17 जानेवरी, 2014 रोजी सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळून आला होता. शशी थरूर यांच्यासोबत सुनंदा यांनी 2010 साली विवाह केला होता. दोघांचा हा तिसरा विवाह होता.

राजकीय नेते शशी थरूर यांची पत्नी म्हणूनच सुनंदा पुष्कर यांची ओळख नव्हती. एक सोशलाइट, बिझनेस वुमन आणि ग्लॅमरस महिला म्हणूनही त्या चर्चेत होत्या. सुनंदा नेहमी दुबईतील हाय-प्रोफाइल पार्टीमध्ये दिसायच्या. बिझनेससोबतच ती फॅशनमध्येही नेहमी अपडेट राहायच्या. दिल्लीतील हाय-प्रोफाइल पार्टीमध्येही सुनंदा आवर्जुन उपस्थित राहात होत्या. आपल्या सर्कलमधील ती सगळ्यात चर्चित सेलिब्रिटी होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सुनंदा पुष्कर यांची निवडक छायाचित्रे...