आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BSF मध्ये निवड होऊनही रुजू होण्यास 57 टक्के अधिकाऱ्यांचा नकार; अजुनही 522 पदे रिक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बीएसएफमध्ये सहाय्यक कमांडंट पदासाठी निवड झालेल्यांपैकी 57 टक्के उमेदवारांनी नोकरीवर रुजू होण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असणाऱ्या बीएसएफमध्ये यापूर्वीच 10 टक्के पदे रिक्तच आहेत. 
 
2015 मध्ये झाली होती परीक्षा
नुकतेच पुढे आलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) च्या परीक्षेतून एकूण 28 उमेदवार बीएसएफमध्ये अधिकारी पदासाठी निवडण्यात आले होते. 2017 मध्ये त्यांना सहाय्यक कमांडंट म्हणून जॉईन करणे अपेक्षित होते. मात्र, यापैकी 16 लोकांनी नौकरीवर रुजू होण्यास ऐनवेळी नकार दिला आहे. येत्या काळात निमलष्करी दलासाठी होणाऱ्या यूपीएससी परीक्षेलाच बसणार नाहीत, अशी शक्यता आहे.
 
2013 मध्ये 110 पैकी 69 अधिकारी रुजू
- बीएसएफमध्ये गेल्या काही वर्षांपासून निवड होऊनही अधिकारी पदावर रुजू होण्यास नकार देत आहेत. 
- 2014 मध्ये बीएसएफने 31 लोकांना निवडले होते. 2016 मध्ये त्यापैकी केवळ 17 जण अधिकारी म्हणून जॉईन झाले. 2013 मध्ये तब्बल 110 लोकांना याच पदावर नियुक्त करण्यात आले होते. तरीही केवळ 69 जणांनी आपला पदभार स्वीकारला आहे. 15 जण केवळ प्रशिक्षण सुरू असतानाच सोडून गेले.
 
बातम्या आणखी आहेत...