आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:च करा कागदपत्रे साक्षांकित!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कागदपत्रांच्या सत्यप्रती साक्षांकित करण्यासाठी यापुढे सनदी अधिकार्‍याकडे जाण्याची गरजच भासणार नाही. कारण केंद्र सरकारने स्व-साक्षांकित कागदपत्रांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभावी प्रशासनासाठी सर्व सरकारी विभागांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक विशेषत: विद्यार्थ्यांची ससेहोलपट थांबणार आहे.

बुधवारी सचिव पातळीवर झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी याविषयीची सूचना केली आहे. प्रमाणपत्र, फोटो, गुणपत्रिका आदी कागदपत्रांना साक्षांकित करण्यासाठी सनदी अधिकार्‍यांकडे चकरा माराव्या लागतात. त्यातही अनेकवेळा चिरीमिरी देऊन हे काम करावे लागल्याच्या अनेक तक्रारीही येत. त्यातून भ्रष्टाचार वाढत होता. त्याला लगाम घालण्यासाठी मोदी यांनी हे पाऊल उचलले आहे. प्रशासकीय नियम सुलभ करण्याचे आदेश मोदींनी दिले आहेत. यापुढे स्वसाक्षांकित करणे पुरेसे ठरणार आहे. कोणत्याही कामात अंतिम टप्प्यात मूळ कागदपत्रे सादर करणे मात्र अनिवार्य असणार आहे. केवळ साक्षांकित प्रतीवर प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही, हे देखील सूत्रांनी स्पष्ट केले.

लोकांची रांगेच्या झंझटीतून सुटका : दुसर्‍या प्रशासकीय पुनर्रचना आयोगाने 2009 मध्ये दिलेल्या अहवालात स्वप्रमाणिकरणाची तरतूद होती. ही प्रक्रिया सहज-सोपी करण्यात आली तर सामान्य नागरिकांना रांगेत तिष्ठत राहण्यापासून सुटका मिळेल, असे प्रशासकीय पुनर्रचना आयोगाने नमूद केले होते.