आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Selfiewithdaughter Activist Kavita Krishnan Calls Pm Modi Lame Duck Sparks Twitter

काँग्रेस नेते जिंदाल यांनी मुलीसोबतचा सेल्फी केला ट्विट, CPI नेत्यांचा मोदींवर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात'मध्ये #SelfieWithDaughter च्या केलेल्या अवाहनाला सीपीआय नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या कविता कृष्णन यांनी विरोध केला आहे. दुसरीकडे मोदींचे कट्टर विरोधी आणि काँग्रेस नेते माजी खासदार नवीन जिंदाल यांनी सोमवारी त्यांचा मुलीसह असलेला सेल्फी ट्विट केला आहे. त्यासोबत जिंदाल यांनी लिहिले आहे, की मला #SelfieWithDaughter कँम्पेन चांगले वाटले. हा माझी कन्या यशस्विनी सोबतचा सेल्फी आहे. त्यांनी @narendramodi आणि #BetiBachaoBetiPadhao टॅग केले आहे.
जिंदाल यांनी ट्विट केले, की हे कँम्पेन सुरु केल्याबद्दल हरियाणातील जिंदच्या बीबीपूर पंचायतीचेही अभिनंदन. जिंदल यांनी #SelfieWithDaughter ट्विट केल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनेही त्यांचे अभिनंदन केले आहे. @IamYaminKhan ने जिंदल यांच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले आहे, की तुम्ही दुसऱ्या पक्षाचे असले तरी #SelfieWithDaughter ला सपोर्ट करत आहात, यामुळेच आपला भारत देश महान आहे.
CPI नेत्या म्हणाल्या, मोदी मुलींची हेरगिरी करतात, #SelfieWithDaughter पासून सावध राहा
कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या कविता कृष्णन यांनी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा विरोध केला आहे. त्यासोबतच कृष्णन यांनी पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केला आहे. कृष्णन यांनी त्यांचे ट्विटर अकाऊंट @kavita_krishnan वर ट्विट करुन मोदींवर आरोप केले आहेत. त्या म्हणतात, '#SelfieWithDaughter ला #LameDuckPM सोबत शेअर करताना सावधगिरी बाळगा. मुलींची हेरगिरी करण्याची त्यांची पार्श्वभूमी आहे.' उल्लेखनिय बाब म्हणजे, गुजरातच्या एका इंजिनिअर तरुणीची मोदी हेरगिरी करत असल्याचा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला होता.
यूजर्सच्या निशाण्यावर #Kavita Krishnan
पंतप्रधान मोदींच्या #SelfieWithDaughte कँम्पेनला विरोध करणाऱ्या सीपीआय नेत्या कविता कृष्णन सोमवार सकाळपासून ट्विटरवर यूजर्सच्या निशाण्यावर आहेत.
वाचा, काही निवडक ट्विटस
*@ramgopaldass_77: So Ultra-left Commie Scumbag> @kavita_krishnan is trending 4 her illogical tweet yesterday. Shame on Kavita Krishnan.

*@prem1733: i can understand the desperation of this pervert women @kavita_krishnan to get famous. but u wont get funds as NGO'S r getting banned
*@ux4mox: मोक्ष™4Ux retweeted This filth @kavita_krishnan has blocked me as she cant take criticisms. And I cant take any Filth either
*@AakashGauttam: Supporters of Kavita Krishnan lives in deep jungle of Naxal affected areas and in Enemy countries like China and Pakistan.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कविता कृष्णन यांचे ट्विट