नवी दिल्लीः देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वेची चाचणी गुरूवारी यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आली. रेल्वेने नवी दि्ल्ली स्टेशनवरून आग्र्यापर्यंतचे 200 किमीचे अंतर 100 मिनिटात पुर्ण केले. या रेल्वेपुढे आग्र्याला 90 मिनटात पोहोचण्याचे लक्ष्य होते. मात्र रेल्वेला ताज नगरीत पोहोचायला 10 मिनटे उशीर झाला. या मार्गावरील नवीन रेल्वे नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.
10 मिनटे उशीर होण्याचे कारण
रेल्वेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेला दहा मिनिटे उशीर होण्याचे कारण म्हणजे, जुन्या फरिदाबादजवळ सुरू असलेले एस कर्व्ह हे होते. जुन्या फरीदाबाद वरून वल्लभगड स्टेशनच्या दरम्यानच्या वळणाचे काम अजून पूर्ण झाले नाही. त्यामुळे रेल्वेला दहा मिनिटे उशीर झाला.
काय आहे एस कर्व्ह
एस कर्व्हला रिव्हर्स कर्व्हही म्हटले जाते. कर्व्ह म्हणजे दोन रेल्वे पटर्यांना टोडण्याचे साधन. या कर्व्हच्या साह्यानेच रेल्वेला कोणत्याही रेल्वेमार्गावर पोहोचणे सोपे होते. मात्र या कर्व्हमुळेच रेल्वे चालकाला आपल्या वेगाला ब्रेक लावावे लागते.
एका अंदाजानुसार, जेव्हा एक कर्व्हवरून दुसर्या कर्व्हवर रेल्वेला पोहोचवले जाते, त्यावेळी अंदाजे रेल्वेचा वेग 40 ते 50 किमी प्रति तास एवढा करावा लागतो.
पुढील स्लाईडवर पहा... या रेल्वेची काही छायाचित्रे.
सर्व फोटो- भूपेंदर सिंह