आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Semi Nude Protest In Uttar Pradesh Legislative Assembly

उत्तर प्रदेश विधानसभेत आमदारांनी शर्ट काढले, जम्मू-काश्मिरात मार्शलच्या कानशिलात लगावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ/ श्रीनगर/ नवी दिल्ली - लोकशाहीच्या स्वातंत्र्याचा अतिरेक करत लोकप्रतिनिधींची विधिमंडळ, संसदेतील थेरं सुरूच आहेत. बुधवारी उत्तर प्रदेश विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण सुरू असताना राष्ट्रीय लोकदलाच्या दोन आमदारांनी शर्ट काढून निषेध व्यक्त केला, तर जम्मू-काश्मीर विधानसभेत गोंधळ घालणार्‍या पीडीपीच्या एका आमदाराने त्याला सभागृहाबाहेर काढणार्‍या मार्शलच्या कानशिलात लगावून खळबळ उडवून दिली, तर राज्यसभेत गोंधळास साथ देणार्‍या मंत्र्यांना सभापतींनी तंबी दिली.
उत्तर प्रदेश विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल बी.एल.जोशी यांचे विधानसभा व विधानपरिषद सदस्यांसमोर अभिभाषण सुरू होते. लेखानुदान पारित करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. सकाळी भाषण सुरू होताच बसप आमदारांनी बेंचवर उभे राहून अखिलेश सरकारविरोधातील बॅनर्स, पोस्टर्स झळकावले. जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या वेळी राष्ट्रीय लोकदलाचे दोन आमदार वीरपाल आणि सुरेश शर्मा यांनी आपले शर्ट काढून सभागृहात झळकावले. प्रचंड गदारोळ सुरू झाल्याने राज्यपालांचा आवाजही ऐकू येत नव्हता. अखेर तीन-चार मिनिटे बोलल्यानंतर त्यांनी भाषण गुंडाळले.
आजमखान यांची मुक्ताफळे
विधानसभेत लोकदलाच्या आमदारांनी गोंधळ घातल्यानंतर अखिलेश सरकारमधील मंत्री आजमखान यांनी सभागृहात मुक्ताफळे उधळली. दोन्ही आमदार आईच्या पोटातून नग्नावस्थेतच बाहेर आल्यासारखे वाटते आहे. ते एवढे मोठे कसे जन्मले याचेच आश्चर्य वाटते. आता केवळ अर्धेच कपडे काढले आहेत. पूर्ण कपडे काढले असते तर जगाला त्यांचे पुरुषत्वही दिसले असते. माणूस दिवसभरात अनेकवेळा नग्न होतो, परंतु कुठे नग्न व्हायचे याचे भान ठेवले पाहिजे, असे आजमखान म्हणाले. त्यानंतर राज्यपाल सभागृहच सोडून गेले.
राज्यसभेत धक्काबुक्की
तेलंगण विधेयकाविरोधात राज्यसभेत तेलगू देसमचे खासदार सी.एम.रमेश यांनी राज्यसभेच्या सरचिटणीसांच्या हातून कागद ओढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी धक्काबुक्कीही केली. सभापतींनी कारवाई करण्याची धमकी देताच त्यांनी सभागृहाची माफी मागितली; पण सभागृहाचे कामकाज संपताच बाहेर येऊन त्यांनी नूर बदलला. केले ते योग्यच होते. मला आपल्या कृत्याबद्दल गर्व वाटतो, असे रमेश म्हणाले.

पुढील स्लाइडमध्ये, पीडीपीच्या आमदाराची थप्पड की गुंज