आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त शिक्षक दांपत्याची गळा चिरून निर्घृण हत्या, घरकामासाठी ठेवलेला नवीन नोकर फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृद्ध दांपत्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. - Divya Marathi
वृद्ध दांपत्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली.
नवी दिल्ली - नॉर्थ-वेस्ट दिल्लीच्या अशोक विहारमध्ये शनिवारी एका फ्लॅटमध्ये वयस्कर दांपत्याचे मृतदेह आढळले. पोलिसांना फ्लॅटमधील सामान अस्ताव्यस्त आढळले. शुक्रवारी रात्रीच चोरांनी चोरीच्या उद्देशाने हे खून केल्याचे मानले जात आहे. मृत दांपत्य निवृत्त शिक्षक होते, त्यांचे वय 65 ते 70 दरम्यान आहे. शिवाय ते निपुत्रिक असून फ्लॅटमध्ये दोघेच राहत होते. दिल्लीच्या भारतनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
चोरांनी गळा चिरून खून केला...
- पोलिस सूत्रांनुसार, अशोक विहार फेज 3च्या 103A दीप एन्क्लेव्हमध्ये रामलाल भूटानी आणि पत्नी कौशल भूटानी राहायचे. दोघेही केंद्रीय शाळेत शिक्षक होते. शनिवारी सकाळी एक ओळखीचा व्यक्ती त्यांना भेटायला गेला. त्याने दार वाजवून खूप वेळ वाट पाहूनही रिस्पॉन्स न मिळाल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली.
- भारतनगर पोलिसांनी दार तोडून पाहिले असता घरातील फरशीवर वृद्ध दांपत्याचे मृतदेह पडलेले होते. महिला आणि तिच्या पतीचा गळा निर्घृणपणे कापण्यात आला होता. शरीरावर अनेक जखमांच्या खुणाही होत्या. चोरीच्या उद्देशानेच दोघांचे खून झाल्याचा कयास लावला जात आहे.
 
घरातला नोकर फरार
- सूत्रांनुसार, वृद्ध दांपत्याने घरकामासाठी काही दिवसांपूर्वीच एक नोकर ठेवला होता. घटनेनंतर नोकर फरार झाला आहे. त्याला कामावर ठेवताना त्याचे व्हेरिफिकेशन केले होते की नाही, याची माहिती पोलिस घेत आहेत.
- फॉरेन्सिक एक्स्पर्टसच्या टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतली जात आहे. यावरून आरोपींचा नक्कीच माग काढता येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...