आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नागरिकांनी 5 लाख जमा केले तरी चौकशी नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटबंदीनंतर ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनी ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम बँकेत जमा केलेली असली तरीही प्राप्तिकर खाते त्यांची पडताळणी करणार नाही. मात्र अशा व्यक्तींना प्राप्तिकर खात्याच्या वेबसाइटवर जाऊन जमा रकमेचा स्रोत सांगावा लागणार आहे. अन्य व्यक्तींसाठी ही मर्यादा २.५ लाख रुपये आहे.

 नोटबंदीनंतर ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या काळात बँकेत पैसे जमा करणाऱ्या प्रत्येकाचीच प्राप्तिकर खाते चौकशी करणार नाही. बँक खात्यातील जमा रकमेची पडताळणी होत आहे. ही छाननी किंवा मूल्यमापन नाही, असे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. ७० पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी जमा केलेल्या २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा रिटर्नशी ताळमेळ जुळल्यास चौकशी होणार नाही.
बातम्या आणखी आहेत...