आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेत्या रीता बहुगुणा BJPमध्ये, म्हणाल्या- पक्षात राहुल यांचे नेतृत्व कोणालाच मान्य नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - उत्तर प्रदेशच्या माजी काँग्रेस अध्यक्षा डॉ. रिटा बहुगुणा जोशी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. गुरुवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या म्हणाल्या, भारतीय सैन्याच्या यशस्वी सर्जिकल स्ट्राइकवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चुकीचे वक्तव्य केले होते. तेव्हापासून त्यांचे मन पक्षात रमत नव्हते. त्यांनी ‘खून की दलाली’सारखा शब्दप्रयोग केला होता.
काँग्रेसने छोट्या पक्षांसोबत मिळून खालच्या दर्जाचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रविरोधी घटकांना संधी मिळाली आहे. त्यांच्या शब्दांनी मला पक्ष सोडण्यास भाग पाडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादाच्या विरोधात चांगले काम करत आहेत. देशात पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राइकच्या रूपाने अशा प्रकारचे काम झाले. त्याबद्दल जगभरातून भारताचे कौतुक होत आहे.
दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. ६७ वर्षीय बहुगुणा या लखनऊच्या कँट मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार आहेत. उत्तर प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या त्या कन्या आहेत. त्यांचे बंधू विजय बहुगुणादेखील उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते.
काय म्हणाल्या रीता बहुगुणा
- पक्ष प्रवेशानंतर रीता बहुगुणा म्हणाल्या, काही दिवसांपूर्वीच माझी अमित शहांसोबत भेट झाली होती. मी फार विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे.
- उत्तर प्रदेशमध्ये जातियवाद वाढला असल्याचा आरोप करीत दोन पक्षांपासून यूपीला मुक्त करायचे असल्याचे सुतोवाच बहुगुणा यांनी केले, मात्र ते पक्ष कोणते हे त्यांनी सांगितले नाही.
- काँग्रेसचे निवडणूक स्ट्रॅटिजिस्ट यांच्याबद्दलची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
- काँग्रेसची पकड ढीली झाली असल्याचे सांगत रीता म्हणाल्या, की आता पक्षाला निवडणूक रणनीतीकार किशोर यांची गरज वाटत आहे.
- कार्यकर्त्यांना कार्यक्रमाच्या एक दिवस आधी कळते की सभा - संमेलन आहे.
- आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुल यांचे नेतृत्व स्वीकारलेले नाही.
- यूपीची झालेली वाईट अवस्था दूर करण्यासाटी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे बहुगुणा म्हणाल्या.
'पुढील निवडणुकीत कोणत्या मंचावर दिसतील सांगता येत नाही '
- रीता बहुगुणा यांच्या भाजप प्रवेशावर काँग्रेस नेते राज बब्बर म्हणाले, की त्या कुठेच स्थीर राहात नाहीत. आता त्या भाजपमध्ये गेल्या आहेत, पुढील निवडणुकीत त्या कोणत्या पक्षाच्या मंचावर असतील हे सांगता येत नाही.
- 'भाजपचा एकसुत्री कार्यक्रम आहे की दगाबाजांची फौज जमा करणे, मग ते कोणत्याही पक्षातील असतील, कोणत्याही प्रदेशातील असतील, अशा दगाबाजांना एकत्र करण्याचा चंग भाजपने केला आहे.'
- 'रीता बहुगुणा या इतिहासाच्या प्राध्यपक राहिलेल्या आहेत, त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा इतिहास पु्न्हा एकदा समोर ठेवला आहे.' त्यांचे वडील उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांनीही अनेक पक्षांतरे केली होती, हे संकेतात स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...