आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिंपचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन, 89 व्या वर्षी मालवली प्राणज्योत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन दिवसांपूर्वीच सिंघल यांचा रुग्णालयातील हा फोटो समोर आला होता. त्यांच्याबरोबर विहिंप नेते प्रवीण तोगडिया. - Divya Marathi
दोन दिवसांपूर्वीच सिंघल यांचा रुग्णालयातील हा फोटो समोर आला होता. त्यांच्याबरोबर विहिंप नेते प्रवीण तोगडिया.
गुडगाव - विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) अध्यक्ष अशोक सिंघल यांचे मंगळवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. गुडगावच्या मेदांता रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सिंघल हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच जेव्हा ते शुद्धीत आले होते, त्यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तेव्हा त्यांनी, मी ठीक आहे, अजून राम मंदिर बनवायचेय अशी प्रतिक्रिया दिली होती. सिंघल हे अनेक वर्षे राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी होते.

अशोक सिंघल यांनी शुक्रवारी रात्री प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची स्थिती अत्यंत नाजूक असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र रविवारी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती.
अडवाणींनी घेतली भेट
मंगळवारी सकाळी सिंघल यांना भेटण्यासाठी लालकृष्ण आडवाणी आणि उमा भारती मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. त्याआधी रविवारी गृहमंत्री राजनाथ सिंह आणि प्रवीण तोगडियांसह अनेक नेत्यांनी त्यांची भेटही घेतली.

अनेक दिवसांपासून खालावली प्रकृती
> व्हिएचपीने दिलेल्या माहितीनुसार, सिंघल यांना गेल्या एका महिन्यापेक्षा अधिक काळापासून श्वासनाशी निगडीत त्रास होता.
> अलाहाबादमध्ये त्यांच्यावर उपचारसुरू होता. पण त्यांच्या प्रकृतीमध्ये फारशी सुधारणा होत नव्हती.
> 20 ऑक्टोबरला प्रकृती खराब झाल्याने त्यांना विशेष विमानाने दिल्लीला आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सुटीही देण्यात आली होती.
> गेल्या आठवड्यात त्यांची तब्येत पुन्हा खालावली. त्यामुळे शुक्रवारी त्यांना मेदांतामध्ये दाखल करावे लागले. त्यांना बेशुद्धावस्तेत आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.
> त्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
पुढील स्लाइड्सवर वाचा सिंघल यांच्या कारकिर्दीविषयी...