आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 टक्के मान्सूनच्या अंदाजाने सेंसेक्सने गाठला उच्चांक, निफ्टी सुद्धा 9400 अंकांवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आशियाई बाजारांमध्ये मजबूत संकेत आणि या वर्षी चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे सेंसेक्सने जोर धरला आहे. बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, धातू, फार्मा, मालमत्ता व्यवसाय, तेल आणि गॅस, उपभोगता वस्तू आणि गुंतवणूक शेयर्समध्ये खरेदी वाढल्याने निफ्टी विक्रमी 9392 अंकांवर पोहोचला आहे. तर, सेंसेक्सने सुद्धा आतापर्यंतचा उच्चांक 30207 चा आकडा पार केला आहे. 
 
अन्नधान्याच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज
- शेयर मार्केटमध्ये बुधवारी आलेली विक्रमी वाढ अंतर्गत अंदाज आणि आंतरराष्ट्रीय संकेत अशा दोन्ही कारणांमुळे झाली आहे. 
- हवामान विभागाने बुधवारी नव्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, मॉनसून 100 टक्के पर्यंत राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी हवामान विभागाने गतवर्षीच्या तुलनेत 94 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. 
- चांगल्या पावसासह चांगले अन्नधान्य उत्पादन असे गणित जुळले आहे. त्यामुळे, यंदा अन्नधान्याच्या वाढीव उत्पादनाच्या अपेक्षेने सुद्धा लोकांचा खरेदी करण्याकडे कल दिसून आला आहे. तसे झाल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सुद्धा वाढणार नाहीत. 
 
बीएसई मार्केट कॅप 126 लाख कोटींहून अधिक
- बीएसईवर लिस्टेड सर्वच कंपन्यांचे एकूण मार्केज कॅप 126 लाख कोटींहून अधिक झाले आहे. 
- दुपारी झालेल्या खरेदी आणि व्यवहारांवरून बीएसई मार्केट कॅप 126.34 लाख कोटींवर पोहोचला आहे. 
- मे महिन्यात यापूर्वी मार्केट कॅप 125.61 लाख कोटींवर बंद झाल्याची नोंद आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...