आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भाचे अांदाेलन अाता दिल्लीतून!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी "विदर्भ कनेक्ट' या सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या समितीने िदल्ली येथून अांदाेलनाला सुरुवात केली अाहे. समितीचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ िवधिज्ञ श्रीहरी अणे यांनी पत्रकारांना ही माहिती िदली.

विदर्भ राज्याच्या मागणीला वेग देण्याची ही याेग्य वेळ असल्याचे विदर्भ कनेक्टच्या प्रतिनिधींनी सांगितले. विदर्भ राज्याच्या मागणीची तीव्रता केंद्र सरकारला िदसून यावी यासाठी िदल्लीतील विदर्भ राज्याची अाघाडी रंजना बाेबडे या सांभाळणार अाहेत. िदल्लीत विदर्भातील ३ लाखांवर लाेक राहतात. त्यांनी विदर्भ राज्याच्या अांदाेलनाला पाठिंबा द्यावा, असे अावाहन अॅड. अणे यांनी केले. लाेकसभा िनवडणुकांच्या अाधी अमरावती, नागपूर, चंद्रपूर अाणि यवतमाळ या िठकाणी जनमत चाचणी घेण्यात अाली हाेती. त्यात क्रमश: ९१, ९७, ९८ अाणि ९४ टक्के लाेकांनी स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, असे मत िदले हाेते. संपूर्ण विदर्भातील लाेकांची मानसिकता ही स्वतंत्र राज्याबाबत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अाम्हाला स्वतंत्र विदर्भासाठी पुढाकार घेणार असल्याचे पत्र िदले हाेते. परंतु आता ते वेगळे बाेलत आहेत. गृहमंत्री राजनाथसिंह हे विदर्भाच्या बाजूने िदसत नाहीत. स्वतंत्र राज्यासाठी रक्तपात व्हावा अाणि लाेकांनी शहीदच व्हावे का? असा प्रश्नही अॅड. अणे यांनी केला. मुख्यमंत्री विदर्भात वेगवेगळ्या याेजना अाणत असल्याचे भासवत असले तरी येथील ६० टक्के सामान्य, गरीब कष्टकऱ्यांना त्यातून काहीही िमळणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.