आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान जिंकल्यावर वाटले ईद आली; फुटिरतावादी नेत्याच्या वक्तव्यावर गौतम गंभीर भडकला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर जल्लोष करताना फुटिरतावादी नेता मीरवाइज उमर फारूक. - Divya Marathi
चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर जल्लोष करताना फुटिरतावादी नेता मीरवाइज उमर फारूक.
नवी दिल्ली- काश्मीरमधील फुटिरतावादी नेता मीरवाइज उमर फारूक याने पुन्हा एकदा पाकिस्तानचे समर्थन केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाकिस्तानच्या विजयानंतर ट्विट करत म्हटले आहे की, सगळीकडे फटाके फुटत आहेत. असे वाटत आहे की जसे काही ईद लवकरच आली आहे. जो उत्तम संघ होता तोच जिंकला आहे. यावर गौतम गंभीर याने ट्विट केले की तुम्ही सीमेपार का निघून जात नाही. यापूर्वीही या फुटिरतावादी नेत्याने ट्विट करत पाकिस्तानी संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

ईद तिकडेच साजरी करा
- गौतम याने ट्विट करत म्हटले की, माझी मीरवाइज उमर फारूक यांना सूचना आहे की ते सीमेपार का निघून जात नाहीत? तिथे तुम्हाला जास्त चांगले चिनी फटाके मिळतील. तिथेच ईद साजरी करावी. तुमचे सामान पॅक करायला मी तुम्हाला मदत करु शकतो.
- यापूर्वी पाकिस्तानने इंग्लंडवर मिळवलेल्या विजयानंतर मीरवाइज यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'आज आमची तरावीह (रमजानच्या महिन्यातील संध्याकाळी केली जाणारी प्रार्थना) संपली आणि फटाक्यांचे आवाज कानी आले. पाकिस्तानने आज शानदार खेळ केला. फायनलसाठी शुभेच्छा.'  
बातम्या आणखी आहेत...