आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Separatists Raise Pakistan Flag In Srinagar Insult India But No Arrests Yet

J&K: मसरत यांच्या \'पाक प्रेमा\'वर मोदी सरकार नाराज, CM मुफ्ती मात्र \'मेहरबान\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: श्रीनगरमध्ये फुटीरतावाद्यांनी काढलेल्या रॅलीत संबोधित करताना सईद शाह गिलानी सोबत मसरत आलम)

नवी दिल्ली/श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती उभारण्याविरोधात फुटीरतावाद्यांनी बुधवारी श्रीनगरमध्ये रॅली काढली. रॅलीत मसरत आलम याने पाकिस्तानचा ध्वज फडकावत 'पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे दिले. यामुळे मोदी सरकारने नाराज झाले असून मसरत आलमवर कारवाई करण्‍याचे केंद्र सरकारने निर्देश दिले आहे. परंतु, मुख्‍यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद आलमवर मेहरबान दिसत आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांना फोनवरून मसरत आलमला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले. परंतु मुफ्तींनी मसरत आलमच्या अटक करण्यास तयार नाही. ' केंद्राने राज्य सरकारवर कोणताही दबाब टाकू नये, आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असल्याचे, मुख्यमंत्री मुफ्ती यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मेहरबानीमुळे तुरुंगाबाहेर आलेल्या दहशतवादी मसरत आलमने देशद्रोही कारवाया सुरु केल्या आहेत. फुटीरतावादी हुरियत गटाचा अध्यक्ष सईद अली शहा गिलानी आणि मसरत आलमने श्रीनगरात एअरपोर्ट रोडवर रॅली काढली होती. रॅलीत मसरत आलम याने पाकिस्तानचा ध्वज फडकावत 'पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे दिले. परंतु, मुफ्ती सरकारने आलम विरोधात अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. देशाविरोधात नारेबाजी करणे, तसेच जमावासमोर चिथावणीखोर भाषण देणार्‍या सईद गिलानी, आलम आणि अनेक फुटीरतावाद्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मसरतने वाचून दाखवला मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदचा संदेश
श्रीनगरात रॅलीत देशा‍विरोधात घोषणा देणार्‍या मसरत आलमने मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदचे संदेश वाचून दाखवला. 'काश्मीर बनेल पाकिस्तान', असे हाफिज सईदने आपल्या संदेशमध्ये म्हटले आहे. दरम्यान, मसरत गेल्या मार्च महिन्यात तुरूंगातून बाहेर आला. चार वर्षांपासून तो तुरूंगाची हवा खात होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, मसरत आलमने काढलेल्या रॅलीचा व्हिडिओ...