आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षांत 16 मुलींचे अपहरण, बलात्कार; नंतर हत्या करून फेकले मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेला आरोपी रविंद्रकुमार याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस कंडक्टर असलेल्या रविंद्रने चौकशी दरम्यान सांगितले की, त्याने 2009 पासून आतापर्यंत दिल्ली, हरियाणी आण यूपीमध्ये अशा प्रकारे अनेक हत्या आणि बलात्कार केले आहे. तो साधारणपणे 3 ते 4 वर्षांच्या मुलींना लक्ष्य करायचा.

गुन्ह्याची कबुली
आरोपी युपीच्या बदायूं येथील राहाणारा आहे. सध्या तो दिल्लीच्या उत्सव विहार परिसरात राहणारा होता. रविंद्रने सांगितले की, तो मुलांना चॉकलेट किंवा पैशाचे आमीष दाखवायचा. त्यानंतर त्यांना निर्जन स्थळी नेऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा. त्यानंतर त्यांचे मृतदेह नाल्यांमध्ये फेकून द्यायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्रच्या विरोधात सबळ पुरावे आहेत.

लायसन्समुळे पकडला गेला
एका सहा वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह घरापासून सुमारे 50 मीटर अंतरावर असलेल्या एका अर्धवट बांधकाम झालेल्या घरात आढळला होता. पोस्ट मॉर्टममध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले. घटनास्थळी पोलिसांना एक ड्रायव्हींग लायसन्स आढळले होते. त्याआधारे रवींद्र कुमारला अटक करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...