आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Serious Problem Stand Before The Nation, Manmohan Singh Told

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती, मनमोहनसिंग यांची संसदेत कबूली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाल्याची कबुली पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी गुरुवारी दिली. देशांतर्गत कारणांसोबतच सिरियातील पेचप्रसंग त्यास जबाबदार असल्याचे ते म्हणाले. रुपयाच्या सातत्याने होणार्‍या घसरणीवर निवेदन करण्याच्या विरोधकांच्या मागणीनंतर पंतप्रधान राज्यसभेत बोलत होते. अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर पंतप्रधान शुक्रवारी संसदेत निवेदन करू शकतात.प्रश्नोत्तरांच्या तासात पंतप्रधान म्हणाले, देश कठीण परिस्थितीचा सामना करत असल्याचे मी नाकारत नाही. देशांतर्गत घडामोडींसोबतच अमेरिकी पतधोरणातील बदही त्यास कारणीभूत आहे. सिरियातील संकटामुळे तेलाच्या किमती वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.