आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीची थट्टा; पैशांच्या जोरावर हवी तसे सर्वेक्षण केले जाते : जदयू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- निवडणूकपूर्व जनमत चाचण्या, सर्वेक्षणे ही लोकशाहीची निव्वळ थट्टा असून पैशांच्या जोरावर हवी तसे सर्वेक्षण केले जाते, त्यामुळे आपल्या पक्षाचा जनमत चाचण्यांना कडवा विरोध असल्याचे जनता दलाने (यू.) म्हटले आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात जदयूने जनमत चाचण्यांवर बंदी घालण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

एकेकाळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असलेल्या जदयूने जनमत चाचण्यांच्या प्रश्नावर काँग्रेसप्रमाणे भूमिका घेतली आहे. काँग्रेसनेही जनमत चाचण्या, सर्वेक्षणांवर बंदी घालण्यास अनुकूलता दर्शवली आहे, तर भाजपने बंदी घालण्यास कडाडून विरोध दर्शवला असून पराभवाच्या भीतीने काँग्रेसने पाठिंबा दिला असल्याची टीका केली आहे.जनमत चाचण्यांना जदयूने नेहमीच विरोध केला आहे. या चाचण्या म्हणजे लोकशाहीची थट्टा असून चाचणीच्या नावाखाली पैशांच्या जोरावर सर्वेक्षणामध्ये फेरफार केले जातात, असे मत जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. आयोगाला लिहिलेल्या दोन पानी पत्रामध्ये म्हटले आहे की, काँग्रेस व भाजप या दोन मोठय़ा पक्षांव्यतिरिक्त इतर कोणतेही पक्ष एवढा पैसा खर्च करू शकत नाहीत. प्रत्येक व्यक्तीचे मत हीच लोकशाहीची ताकद असून पैशांच्या जोरावर धनाढय़ लोक हळूहळू या ताकदीवर कब्जा मिळवत आहेत. जनमत चाचण्या हा त्याचाच एक भाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जनमत चाचण्यांबाबत सुरू असलेली चर्चा सुरू राहिल्यास लोकशाहीला धोका असल्याचे यादव यांनी पत्रात म्हटले आहे.