आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Service Charges In Your Hotel Bills Not Service Tax

बिलातील सर्व्हिस चार्ज चालकांच्याच खिशात, सर्व्हिस चार्ज म्हणजे "सर्व्हिस टॅक्स' नव्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्मक छायाचित्र
नवी दिल्ली - हॉटेलांतील सर्व्हिस चार्जबाबत (सेवा शुल्क) अर्थ मंत्रालयाने स्पष्टीकरण जारी केले. त्यानुसार, काही हॉटेल्स, रेस्तराँ खाद्यपदार्थ व पेयांवर सर्व्हिस चार्जही वसूल करत आहेत. त्याबाबत बहुतांश ग्राहकांत गैरसमज आहे. ग्राहकांना वाटते की, हॉटेलकडून घेतला जाणारा सर्व्हिस चार्ज हा सरकारला मिळतो. मात्र, तो सर्व्हिस टॅक्स (सेवा कर) नाही. म्हणजेच बरीचशी हॉटेल्स सर्व्हिस चार्जच्या नावाखाली बिलात लावलेली रक्कम स्वत:कडेच ठेवतात. सरकार फक्त सर्व्हिस टॅक्सचेच पैसे घेते.

वातानुकूलित हॉटेल, रेस्तराँमध्ये बिलावर सर्व्हिस टॅक्स आकारला जातो. सामान्यपणे सेवाकरचा दर १४ टक्के आहे. मात्र, खाण्यापिण्याच्या पदार्थांवर एकूण बिल रकमेच्या ६० टक्के कर सूट (अबेटमेंट) मिळते. म्हणजेच बिलाच्या ४० टक्के रकमेवरच सेवाकर लागतो. संपूर्ण बिलावर ५.६ टक्के दराने सेवाकर आकारणी होतो. आधी सेवाकराचा दर १२.३६ टक्के होता. या जूनपासून तो १४ टक्के झाला आहे.