आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Seven IMP Developments Of Delhi Assembly Elections

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली निवडणुकीतील या 7 बाबींचा होईल देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराची धामधुम काल संपली. आता वाट बघितली जात आहे, ती मतदानाची. मतदार राजा कुणाला निवडून आणेल आणि कुणाला दूर सारेल काही सांगता येत नाही. निवडणुकपूर्वी मतचाचण्यांमध्ये आम आदमी पक्षाला बढत दाखवण्यात आली असली तरी नेमक्यावेळी काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे अवघ्या भारताचेच नव्हे तर जगाचे लक्ष दिल्लीच्या रणसंग्रामावर लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या निमित्ताने एवढी राजकीय स्थित्यांतरे बघायला मिळालीत, की त्याचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे बघण्यासारखे राहणार आहे. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, दिल्ली निवडणुकीतील सात महत्त्वपूर्ण बाबी ज्यांचा देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही...
1- अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार?
आम आदमी पक्षाला जर बहुमत मिळाले तर दिल्लीच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात ही एक महत्त्वपूर्ण घडामोड असेल. या पक्षाने गेल्या वेळी पहिल्यांदा निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी बहुसंख्य जागा निवडून आणल्या होत्या. पण सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसची मदत घ्यावी लागली होती. आता बहुमत मिळाले तर हा पक्ष इतर राज्यांमधील निवडणुकांमध्ये प्रभाविपणे उतरण्याची दाट शक्यता असेल. भाजप आणि कॉंग्रेस पक्षाव्यतिरिक्त एक आणखी पर्याय मतदारराजाला मिळेल.
पुढील स्लाईडवर वाचा, इतर सहा महत्त्वपूर्ण बाबी... तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा कस... त्यांचा विजयी अश्वमेध रोखला जाणार का...