आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seven Out Of 12 Seats Win NDA, Eight States By Polls

बारापैकी सात जागा एनडीएच्या ताब्यात, अाठ राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पंजाबसह आठ राज्यांतील १२ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकांत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने ७ जागा जिंकल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी हा विकासाचा विजय असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील पालघर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने राखला आहे.

उत्तर प्रदेशात तीन जागी सत्तारूढ समाजवादी पार्टीला दोन ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. मुजफ्फरनगरमध्ये भाजपच्या कपिल देव अग्रवाल यांनी सपाचे गौरव स्वरूप यांना हरवले. देवबंदमध्ये काँग्रेसच्या माविया अली यांनी सपाला हरवले. बीकापूर जागेवर मात्र सपाच्या आनंद सेन यांनी विजय मिळवला.

बिहारमध्ये हरलाखीत भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोक समता पार्टी, पंजाबच्या खडूरसाहिबमध्ये शिरोमणी अकाली दल विजयी झाले. भाजपच्या नारायण त्रिपाठींनी मध्य प्रदेशातील मैहरची जागा काँग्रेसकडून हिसकावली. कर्नाटकातील देवदुर्ग, हेब्बलमध्ये भाजपची सरशी झाली. बीदरमध्ये काँग्रेसने झेंडा रोवला. तेलंगणच्या नारायणखेडची जागा तेलंगण राष्ट्र समितीच्या भूपाल रेड्डी यांनी काँग्रेसकडून हिसकावली. त्रिपुरातील बिरगंजमध्ये माकपचे परिमल देवनाथ यांनी भाजपवर विजय मिळवत जागा राखली.

पुढे वाचा.. शिवसेनेने राखली पालघरची जागा